खासदार-आमदारांमधील शाब्दिक वादाचे जिल्ह्यात पडसाद; कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:07+5:302021-02-05T09:29:07+5:30

२६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला असून, दोघांनीदेखील ...

Repercussions of verbal disputes between MPs and MLAs in the district; Crimes filed against activists! | खासदार-आमदारांमधील शाब्दिक वादाचे जिल्ह्यात पडसाद; कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल !

खासदार-आमदारांमधील शाब्दिक वादाचे जिल्ह्यात पडसाद; कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल !

२६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला असून, दोघांनीदेखील वाशिम शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधींमधील या शाब्दिक वादाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात दखलपात्र स्वरूपाचे ७ तर अदखलपात्र स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल करण्यात आले, त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांतता प्रस्थापित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार वाशिम, मंगरूळपीर व कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ७४ इसमांविरुद्ध स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. या प्रकरणात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एकतर्फी आदेश देऊन एकूण ७४ इसमांना स्वघरी स्थानबद्ध राहण्याचे आदेश दिले तसेच या कालावधीत त्यांना इतरत्र फिरण्यास मनाई करण्यात आली. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध यापूर्वीच्या व सध्याच्या दाखल गुन्ह्यांवरून हद्दपार, मकोका आदी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावरून प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे प्रस्ताव मागवून एकूण २१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक परदेशी यांनी पोलीस यंत्रणेला दिले.

Web Title: Repercussions of verbal disputes between MPs and MLAs in the district; Crimes filed against activists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.