युगच्या मारेकर्यांना फाशीच द्या
By Admin | Updated: September 12, 2014 22:58 IST2014-09-12T22:58:11+5:302014-09-12T22:58:11+5:30
मानोरा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मोर्चा.

युगच्या मारेकर्यांना फाशीच द्या
मानोरा : नागपूर येथील युग चांडक या ८ वर्षीय चिमुकल्याचो अपहरण करून द्वेष व लालसेपायी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता १0 सप्टेंबर रोजी सहा शाळा व माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात मूकमोर्चा काढून तहसीलदार मानोरा यांना निवेदन देण्यात आले. नागपूर येथील दंतशल्य चिकित्सक डॉ.मुकेश चांडक यांचा ८ वर्षीय मुलगा युग चांडक यांचे राजेश धन्नालाल दवारे व अरविंद अभिलाष सिंग या आरोपींनी केवळ द्वेषभावनेतून अपहरण करून हत्या केली. या घटनेचा समाजातील सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मानोरा येथील चिंतामणी इंग्लीश शाळा, रहेमानिया उदरु हायस्कूल, लोकहित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सुलेमानिया उदरु हायस्कूल, एलएसपीएम हायस्कुल, मातोश्री सुभद्राबाई पाटील कॉलेज, सहा शाळा व माहेश्वरी समाज विकास संस्था, विदर्भ विकास बहुउद्देशीय, माहेश्वरी युवा मंच आदिच्या वतीने मूकमोर्चात सहभागी होऊन सदर घटनेचा निषेध करून युगची हत्या करणर्या मारेकरींना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत तहसीलदार मानोरा यांना निवेदन सादर केले. तसेच तहसील कचेरी प्रमाणात सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.