कृषी उपसंचालकांची पार्डी ताड परिसरास क्षेत्रीय भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:30+5:302021-01-17T04:35:30+5:30

आपल्या क्षेत्रीय भेटीत विजय हिरेमठ यांनी हिसई येथील भास्कर जाधव यांनी खरीप हंगाम २०२१ साठी राखीव ठेवलेल्या २० ...

Regional visit of Deputy Director of Agriculture to Pardi Tad area | कृषी उपसंचालकांची पार्डी ताड परिसरास क्षेत्रीय भेट

कृषी उपसंचालकांची पार्डी ताड परिसरास क्षेत्रीय भेट

आपल्या क्षेत्रीय भेटीत विजय हिरेमठ यांनी हिसई येथील भास्कर जाधव यांनी खरीप हंगाम २०२१ साठी राखीव ठेवलेल्या २० क्विंटल बियाण्यांची पाहणी केली तसेच पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करून करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याशिवाय बालदेव येथील जितेंद्र जयस्वाल यांनी अमर पट्टा पद्धतीने पेरणी केलेल्या तूर पिकाची, तुळजापूर येथील दामोदर पाकधने यांनी शेतात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची पाहणी केली. दामोदर पाकधने यांनी मल्चिंग वरील तूर पिकाची लागवड, तसेच खरबूज व टरबूज, गहू कुदरत ९ या वाणाची पेरणी केली आहे. तालुक्यातील कृषी विषयक योजना व कामांविषयी कृषी उपसंचालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, तंत्र अधिकारी कंकाळ, प्रगतशील शेतकरी केशव भगत, कृषी सहायक अमोल हिसेकार, सुमेध खंडारे, सुरेश इंगोले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय दुधे यांच्यासह शेतकरी हजर होते.

Web Title: Regional visit of Deputy Director of Agriculture to Pardi Tad area