शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 1:59 AM

गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देएकाच दिवशी २५ गावांत जिल्हा परिषद चमूंची धडक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली.ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामांना गती देणे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामूहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा हा उपक्रम सुरू आहे. वारंवार सूचना, विनंती करूनही शौचालय न बांधणार्‍या नागरिकांच्या घरावर आता ‘लाल स्टिकर’ लावून निर्वाणीचा इशारा दिला जात आहे. आता काही मोजक्या नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम केले नसल्याने गाव हगणदरीमुक्त होणार नाही. पर्यायाने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीपासून त्या-त्या गावांना वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, याची माहिती गावपातळीवर दिली जात आहे. स्वच्छता राखणे, महिलांची प्रतिष्ठा जपणे आणि गावविकासासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी मिळविणे आदीसंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने पाटील आदींनी केले आहे.दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी मंगळवारी वाशिम तालुक्यातील पंचाळा, सुरकंडी खुर्द, सुरकंडी बु., येथे भेटी देऊन शौचालय बांधकाम व वापराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी वाघ, सहायक गटविकास अधिकारी वानखेडे, पंचाळा सरपंच सुरेखा डुबे, उपसरपंच हनुमान मोरे, सदस्य केशव इंगोले, इमामभाई दर्गीवाले, यशोदा मोरे, साहेबराव इंगोले, सतीश डुबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. -

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान