मार्च अखेर विज वितरण कंपनीची दोन कोटींची वसूली

By Admin | Updated: April 5, 2017 13:35 IST2017-04-05T13:35:53+5:302017-04-05T13:35:53+5:30

तालुक्यातून मार्च अखेर विज वितरण कंपनीची थकीत असलेली दोन कोटी रुपयांची वसूली झाली आहे.

Recovery of two crore rupees of Vij distribution company by March | मार्च अखेर विज वितरण कंपनीची दोन कोटींची वसूली

मार्च अखेर विज वितरण कंपनीची दोन कोटींची वसूली

मालेगाव - तालुक्यातून मार्च अखेर विज वितरण कंपनीची थकीत असलेली दोन कोटी रुपयांची वसूली झाली आहे. वीज वितरण कंपनीने जानेवारी २०१७ पासून घरगुती ,औद्योगिक ,वाणिज्य यासाठी विज वापरणाऱ्या थकीत ग्राहकाकडून वसुलीची मोहीम राबविली होती. उप कार्यकारी अभियंता राजेश चव्हाण ,क्षेत्रीय अभियंता क्षीरसागर ,नवरे ,पडघान ,निर्मळ ,जिवन इंगले ,लादे यांनी वसूली मोहीम राबविली , त्यासाठी त्यांना लिपिक राम कुटे ,गणेश घूगे ,रवि खन्डागले ,कु शिवानि अग्रवाल तसेच विज वितरण कम्पनीचे जनमित्र यानी सहकार्य केले .

Web Title: Recovery of two crore rupees of Vij distribution company by March