लसीचे दुसरे डोस मिळाले; तुटवडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:21+5:302021-05-12T04:42:21+5:30
मालेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत झाला असून या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या आदेशाने ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस ...

लसीचे दुसरे डोस मिळाले; तुटवडा कायम
मालेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत झाला असून या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या आदेशाने ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस देण्यात आली व ही लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसादही दिला. त्यामुळे तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असूनही हा आजार नियंत्रणात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे; पण लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना वेळेवर लस मिळत नाही. दरम्यान, तालुक्यात ४५ वर्षावरील काही नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेऊन ५० ते ५५ दिवस संपले असूनही अशा नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळत नाही. याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. अखेर सोमवारी लस उपलब्ध झाली असून काही नागरिक आणि काही कर्मचारी याना मिळाली. मात्र अजूनही अनेक नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे. तालुक्यातील शिरपूर, जऊळका, मालेगाव ग्रामीण रुग्णालय तसेच शहरात सिद्धेश्वर कॉलनी, गजानन महाराज मंदिर येथे ज्यांनी ज्या केंद्रावर पहिला डोस घेतला, त्यांना तिथेच सोयीचे व्हावे म्हणून आरोग्य विभागाने नियोजन केले होते. मात्र डोस कमी असल्यामुळे कर्मचारी वर्गाचीसुद्धा तारांबळ उडाली होती.