‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम प्राप्त

By Admin | Updated: April 16, 2017 13:34 IST2017-04-16T13:34:17+5:302017-04-16T13:34:17+5:30

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत.

Receipts of 29 lakh rupees for 'Tantamukta' 15 Gram Panchayats | ‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम प्राप्त

‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम प्राप्त

वाशिम:  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी पुरस्काराची २९ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, आॅनलाईन प्रणालीद्वारे ही रक्कम ग्रामपंचायतींना वितरित केली जाईल, असे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी रविवारी सांगितले.
तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावंगा जहांगीर व रिठद, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत एकलासपूर, आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत इचोरी, कळंबा बोडखे, चिखलागड व फाळेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा घाडगे (बु.), वरोली व सावळी, मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत जोगलदरी, जुनापानी यासह जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत कार्ली, किनखेडा, हनवतखेडा व सोनाळा वाकापूर या ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींकरिता एकूण २९ लाख रुपये बक्षिसांची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम आॅनलाईन प्रणालीद्वारे संबंधित ग्रामपंचायतींना वितरित केली जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतींना बँकेचे नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड आदी माहिती तत्काळ संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे, असेही होळकर यांनी सांगितले.

Web Title: Receipts of 29 lakh rupees for 'Tantamukta' 15 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.