अंबेझर पार्श्वनाथ मंदिरात रत्नत्रय विधान उत्साहात
By Admin | Updated: August 26, 2014 22:48 IST2014-08-26T22:48:05+5:302014-08-26T22:48:05+5:30
श्री अंबेझर पार्श्वनाथ दि. जैन मंदिरात रत्नत्रय विधानाचे आयोजन करण्यात आले होते.

अंबेझर पार्श्वनाथ मंदिरात रत्नत्रय विधान उत्साहात
वाशिम : येथील श्री अंबेझर पार्श्वनाथ दि. जैन मंदिरात रत्नत्रय विधानाचे आयोजन करण्यात आले होते. हे विधान २२ व २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले.
या रत्नयत्र विधानाचा प्रारंभ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३0 वाजता झाला. येथील संध्या व अशोक टिकाईत या दाम्त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. त्यापूर्वी समस्त महिलांची शोभायात्रा निघाली होती. या वेळी प्रमुख मार्गदर्शक पं. केशरीचंद सावले हे उपस्थित होते. त्यांचे हस्ते भगवंताची पूजा अर्चा तसेच शेवटी होमहवन होऊन सप्ताही झाली.
या विधानात येथील नानासा कान्हेड, राम पंचभाई, अशोक टिकाईत, विजयकुमार बांडे, मदन बांडे, तसेच वंदना कां. कान्हेड, संध्या टिकाईत, विजया कान्हेड, आराधना कान्हेड, जयमाला वाल्ले, ममता कान्हेड, विनया कान्हेड, मंगला बांडे, कमल वाळले, मंदाबाई बांडे, मंदाबाई कान्हेड, तेजस्विनी रवने, सुवर्णा भुरे, सरला वाळले, कल्पना डव्हाळे, नंदा मोतुळे, माला बांडे, अनिता भुरे, समता रवने, चारुलता बांडे, विमलबाई वाळले, मंदाबाई बांडे, अनिता भुरे, भावना भुरे, सुमनबाई वाळले, सिमा आहाळे, सरिता बांडे, अपर्णा पंचभाई, अस्मिता सावले, शोभा वाळले, विमल नं. वाळले, दया टिकाईत, छाया बांडे या महिला सहभागी झाल्या होत्या.