वाशिम जिल्हयात २० गावांत दिली जाणार रेशन दुकाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:36 PM2019-01-19T13:36:32+5:302019-01-19T13:36:51+5:30

वाशिम :  जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

Ration shops in 20 villages in Washim district! | वाशिम जिल्हयात २० गावांत दिली जाणार रेशन दुकाने!

वाशिम जिल्हयात २० गावांत दिली जाणार रेशन दुकाने!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 
ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याचे अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयं सहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राथम्यानुसार रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार असून संबंधितांनी २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयामार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले.
वाशिम तालुक्यातील वाशिम शहर वार्ड क्र. ४, वाशिम शहर वार्ड क्र. ९, कुंभारखेडा, धारकाटा, मालेगाव तालुक्यातील कुरळा, झोडगा खु., वरदरी खु., पांगरखेडा, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पाचांबा, मंगरूळपीर तालुक्यातील चाधई, एकांबा, बालदेव, मोतसावंगा, शेलगाव, स्वाशिन, कारंजा तालुक्यातील पिंपळगाव खु., मानोरा तालुक्यातील शिंगडोह व जामदरा घोटी या २० रास्तभाव धान्य दुकानांचे परवाने वितरीत करण्यात येणार आहेत, असे वानखेडे यांनी सांगितले.


वाशिम तालुका
वाशिम शहर वार्ड क्र. ४
वाशिम शहर वार्ड क्र. ९
कुंभारखेडा
धारकाटा
---------------
मालेगाव तालुका
कुरळा
झोडगा खु.
वरदरी खु.२ 
पांगरखेडा
----------------
रिसोड तालुका 
तपोवन
जायखेडा
पाचांबा
---------------
मंगरूळपीर तालुका 
चाधई
एकांबा
बालदेव
मोतसावंगा
शेलगाव
स्वाशिन
---------------
कारंजा तालुका 
पिंपळगाव खु.
मानोरा तालुका
शिंगडोह 
जामदरा घोटी

Web Title: Ration shops in 20 villages in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम