मतदार जागृतीसाठी धावणार रथ

By Admin | Updated: September 25, 2014 01:26 IST2014-09-25T01:26:06+5:302014-09-25T01:26:06+5:30

निवडणूक निरिक्षक राजन यांनी दाखविली हिरवी झेंडी.

Rath will run for voter awareness | मतदार जागृतीसाठी धावणार रथ

मतदार जागृतीसाठी धावणार रथ

वाशिम : आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी ह्यमतदार जागृती रथह्ण तयार करण्यात आला आहे. मतदार जागृतीविषयी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सी. सेंथील राजन यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर हा रथ मार्गस्थ झाला. वाशिम उपविभागीय कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी , उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदार जागृतीसाठी बनविण्यात आलेल्या या रथावर विविध संदेश देणार्‍या फलकांबरोबरच संत तुकडोजी महाराज यांनी मतदानाविषयी लोकांना केलेल्या आवाहनाचा फलकही बसविण्यात आला आहे. हा रथ वाशिम मतदार संघातील शहरे, गांवामध्ये पोहचून मतदार जागृती करणार आहे.

Web Title: Rath will run for voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.