रासायनिक खतांचे दर आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST2021-04-04T04:42:55+5:302021-04-04T04:42:55+5:30
जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्यात भाजीपाला, गहू, हरभरा, भूईमूग, उन्हाळी सोयाबीन, मूग आदी पिके घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची ...

रासायनिक खतांचे दर आवाक्याबाहेर
जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्यात भाजीपाला, गहू, हरभरा, भूईमूग, उन्हाळी सोयाबीन, मूग आदी पिके घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते; मात्र रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली असून प्रत्येक खताच्या किमती सरासरी २०० ते २५० रुपयांनी वाढल्या आहेत. कोणत्याही पिकासाठी हेक्टरी आठ बॅग रासायनिक खताची गरज असते. याप्रमाणे १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
------------------------------------------
शेणखत मिळणे दुरापास्त!
पूर्वी शेतकरी शेतात शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत, परंतु गेल्या काही वर्षांपासून शेणखात मिळणे दुरापास्त झाले आहे. सर्वच शेतकरी रासायनिक खत शेतात टाकत आहेत. पिकाला खताची योग्य मात्रा दिली नाही, तर अपेक्षित उत्पन्न देखील मिळत नाही. त्यामुळे रासायनिक खतांचे दर वाढले असले तरी ते नाइलाजास्तव खरेदी करावे लागत आहे.
-------------------------
खतांच्या दरवाढीमुळे लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन न झाल्यास शेती तोट्याची होणार आहे. शासनाने खतांची दरवाढ त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- सुभाष नानवटे, शेतकरी, वाळकी-दोडकी