घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 22, 2015 00:21 IST2015-01-22T00:21:55+5:302015-01-22T00:21:55+5:30
गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई; हिंगोली जिल्ह्यातील आरोपीस २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी.
_ns.jpg)
घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
वाशिम: येथील आययुडीपी कॉलनीमध्ये १६ जानेवारीचे उत्तररात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून मोबाईल हँडसेट व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेतील एका आरोपिला पकडण्यात शहर पोलिस स्टेशनच्या डीटेक्शन ब्रँचला २0 जानेवारी रोजी यश आले. या आरोपिला २७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनीमध्ये संतोष वैद्य यांच्या घरामधुन १६ जानेवारीचे उत्तररात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून तीन मोबाईल हँडसेट व रोख १0 हजार रूपये लंपास केले होते. या घटनेचा तपास ठाणेदार संग्राम सांगळे यांनी डीटेक्शन ब्रँचचे प्रमुख उदय सोयस्कर, राजेश बायस्कर, सुनिल पवार व हरिष दंदे यांच्या पथकाकडे सोपविला. या पथकाने अवघ्या तीन दिवसात आरोपिचा छडा लावून हिंगोली जिल्ह्यातील ईचा येथील २२ वर्षीय बुगाची ज्ञानबा चव्हाण याला ताब्यात घेतले. आरोपी चव्हाण याने घरफोडी केल्याची कबुली दिली असुन यामध्ये त्याला सहकार्य करणार्या ईतर आरोपिंचा शोध घेण्यासाठी न्यायालयाने चव्हाण याला २७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.