पार्डी तिखे येथे महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: March 2, 2016 02:40 IST2016-03-02T02:40:49+5:302016-03-02T02:40:49+5:30

पीडित महिलेची तक्रार; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल.

Rape of a woman at Pardi Tikha | पार्डी तिखे येथे महिलेवर बलात्कार

पार्डी तिखे येथे महिलेवर बलात्कार

शिरपूर जैन (जि. वाशिम ): येथून जवळच असलेल्या पार्डी तिखे येथे शेतात एका महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी घडली. महिलेने १ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही सावरगाव बडे येथे माहेरी आली असता, सकाळी तिला लखन भिसनराव पवार व एका अल्पवयीन सहकार्‍याने गाडीवर बसवून पार्डी तिखे येथील शेतात नेले व तिच्यावर बलात्कार केला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३६२, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rape of a woman at Pardi Tikha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.