खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 14, 2015 01:10 IST2015-04-14T01:10:29+5:302015-04-14T01:10:29+5:30
मंगरूळपीर येथील साडेसात लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण.
_ns.jpg)
खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
मंगरुळपीर : फिर्यादी महिलेच्या पतीस पळवून नेऊन साडेसात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौशल्या नारायण वाणी रा. येडशी या महिलेने तक्रार दिली की, आरोपी बंडूआप्पा खान रा. वाळी पंढरपूर याने फिर्यादीच्या पतीस पळवून नेले व सोडून देण्यासाठी मोबाईलवरून ७.५0 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसर्या एका अन्य घटनेत विनयभंग व मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचाळा येथील २५ वर्षीय महिलेने तक्रार दिली की, १३ एप्रिल रोजी फिर्यादी तिच्या पतीसोबत मोटारसायकलने घरी जात असताना, आरोपी आदेश जाधव, लक्ष्मण जाधव, रामराव कदम, अमोल कदम रा. चिंचाळा यांनी पाठलाग केला. फिर्यादीच्या पतीने याबाबत विचारणा केली असता आरोपी क्र.१ ने मारहाण करून फिर्यादीचा विनयभंग केला. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिसर्या घटनेत मंगरुळपीर शहरातील मंगलधाम येथील २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी घडली आहे. फिर्यादी शंकर माणिक बाबरे यांनी तक्रार दिली की, गोपाल गणेश बाबरे याने घरी कोणी नसताना छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.