वाशिम येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा
By Admin | Updated: September 23, 2014 01:12 IST2014-09-23T01:12:07+5:302014-09-23T01:12:07+5:30
लोकमत सखी मंचच्यावतीने दोन दिवसीय रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.

वाशिम येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा
वाशिम : लोकमत सखी मंचच्यावतीने खास महिलांसाठी २७ व २८ सप्टेंबर रोजी स्थानिक मालतीबाई सरनाईक विद्यालयात दोन दिवसीय रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.सद्या सणासुदीचे दिवस आले असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. कुठले ही शुभकार्य करण्याकरिता दारासमोर सुबक रांगोळी असणे आपल्या संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग आहे. रांगोळी जर स्वत:च्या हाताने काढली तर एक वेगळेच समाधान व आनंद मिळतो. पण नाविण्यपुर्ण रांगोळी काढणे एक प्रश्नच असतो. रांगोळी अशी असावी जी सर्वांचे लक्ष वेधून घेईल. तर मग तयार रहा अशा नविन प्रकारच्या रांगोळया शिकण्याकरिता. लोकमत सखीमंच तुमच्याकरिता घेवून आले आहे २ दिवसीय रांगोळी प्रशिक्षण शिबिर. या शिबिरात अकोला येथील प्रविण पवार प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये बेसीक रांगोळी सोबतच स्टिच रांगोळी, दिव्यांची रांगोळी, फिगस रांगोळी, एम्बॉस रांगोळी इत्यादी शिकायला मिळणार आहे. हे शिबिर दि.२७ व २८ सप्टेंबर रोजी स्थानिक मालतीबाई सरनाईक विद्यालय येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत राहणार आहे. या करिता सखी मंच सदस्यांकरिता ५0 रुपये व इतर महिलांसाठी १00 रुपये शुल्क राहणार आहे. रांगोळी शिकण्याकरिता प्रशिक्षणार्थी यांना पांढरी रांगोळी १0 वेगळया रंगाच्या रांगोळया, १ स्केल, पेन, वही सोबत आणायचे आहे. नाव नोंदणी लोकमत शहर कार्यालय वाशिम अर्बन बँक जवळ पाटणी चौक वाशिम येथे सुरु आहे. अधिक माहिती करिता सखी मंच संयोजीका मिनाक्षी फिरके ९८५0३८२१४0, वाशिम विभाग प्रमुख संतोष अग्रवाल ८४२१९५३७२७, रश्मी सारस्कर रिसोड विभाग प्रमुख ९५0४८७४२५२ यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.