कारंजा पोलिसांनी पकडला तांदळाचा ट्रक!

By Admin | Updated: June 30, 2017 01:19 IST2017-06-30T01:19:34+5:302017-06-30T01:19:34+5:30

वाशिम : मंगरूळपीरकडून तांदळाचे कट्टे घेऊन जाणारा ट्रक कारंजा पोलिसांनी २८ जूनच्या रात्री १० वाजतादरम्यान पकडला.

Ranch truck caught by Karanja police! | कारंजा पोलिसांनी पकडला तांदळाचा ट्रक!

कारंजा पोलिसांनी पकडला तांदळाचा ट्रक!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंगरूळपीरकडून तांदळाचे कट्टे घेऊन जाणारा ट्रक कारंजा पोलिसांनी २८ जूनच्या रात्री १० वाजतादरम्यान पकडला. हा ट्रक पोलीस स्टेशनला लावण्यात आला असून, पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांना कारंजा तहसीलदारांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
कारंजा ते खासगी पेट्रोल पंपादरम्यान नाकाबंदी असताना हा ट्रक पकडण्यात आला. तांदूळ नेमका कशाचा आहे, यासंदर्भात कारंजा पोलिसांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, २९ जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंत तहसीलदारांकडून अहवाल प्राप्त झाला नसल्याने याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. अहवालानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे ठाणेदार बोडखे यांनी सांगितले.

Web Title: Ranch truck caught by Karanja police!