वाशिम जिल्ह्यात रमजान ईद
By Admin | Updated: July 30, 2014 00:48 IST2014-07-30T00:33:15+5:302014-07-30T00:48:45+5:30
मुस्लिम बांधवांनी परस्परांना दिल्या शुभेच्छा, हिंदू बांधवांनी जोपासली एकात्मकता

वाशिम जिल्ह्यात रमजान ईद
वाशिम: आत्मशुद्धी चे पर्व असलेल्या मुस्लिम समाजबांधवांच्या रमजान ईद म्हणजेच ईद उल फित्रच्या दिवशी मंगळवार २९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हयात हजारोंच्या संख्येत मुस्लिम बांधवांची सामुहीक नमाज अदा केली. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रार्थना केल्यानंतर हिंदु व मुस्लिम बांधवानी परस्परांना अलिंगन देवून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम धर्मावलंबीच्या पवित्र सण असलेल्या रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवस म्हणजेच रमजान ईद या निमित्त शहरातील निमजगा परिसरातील ईदगाह मैदानात सामुहीक नमाज प्रार्थना करण्यात आली. शाही जामा मशिदीचे हमाम हाफीज शमीम अख्तर यांनी सुरवातीला नमाज अदा केल्यानंतर मौलवी ताजुद्दीन खतीब यांनी अरबी खुतबा चे वाचन केले. तद्नंतर मौलाना ईरफान व शफीज जमीर यांनी समाजबाधंवाना विधायक कार्यासाठी दान देण्याची प्ररेणा दिली .हमाम रामीम अख्तर यांनी समाजबाधंवांना दिलेल्या संदेशामध्ये रमजान माह मध्ये करण्यात येणार्या रोजा उपवासाचे महत्व विषद केले. देशातील प्रत्येक धर्माच्या अनुयायींनी आपले जीवन शिस्तमय व सौहार्दपूर्ण जीवन जगण्यास राष्ट्राची उन्नती झपाटयाने होईल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रामचं्रद कुळकर्णी, उपविभागीय अधिकारी अशेक अमानकर, तहसिलदार आशिष बिजवल, मुख्याधिकारी वसंत इंगोले, पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे पोलिस निरीक्षक वांढरे शहर वाहतुक शाखेचे ङ्म्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक सोईसकर, नगर परिषद उपाध्यक्ष मोहम्मद जावेद, नगरसेवक सलीम बेनिवाले, नगरसेवक प्रविण सोमाणी, नगसेवक राजू वानखेडे, नितीन उलेमाले, पंकज उलेमाले, वाय.बु.इंगोले, चंद्रकांत साठे, राजु धोंगडे, आदींनी मुस्लिम समाज बाधंवाना ईद निमित्त मुबारकबाद देवून शुभेच्छाचे आदान प्रदान केले याप्रसंगी मुस्लिम समाजातील जामा मशिदीचे अध्यक्ष अब्दुल नईम, सचिव दाउदखा पठाण, नगिना मशिदीचे अध्यक्ष मो. युसूफ विजामी, मदिना मशिदीचे अध्यक्ष रउफशा, तोंडगाव मशिदीचे अध्यक्ष हाजी अकिलभाई मिस्त्री, माजी नगसेवक शेख अलताफ, प्रा.अबरार मिर्झा, सय्यद जावेद, माजी नगरसेवक मो.एजाज मो.यकुब, पिरु बेनिवाले, बबलू उर्फ खालीद अली खान, सय्यद जावेद, डॉ.तसलिम शेख, नबी कुरेशी, इरफान कुरेशी, बाबुभाई उर्फ मो.आरिफ, सय्यद लिायकत, फिरोज खतीबख्बाबाभाई शेख असलम, रसुलभाई, हाजी अ.मुनाफ,शेख मुख्तार, नाजीमभाई, अख्तरभाई, डायनुमावाले, सलीमभाई, मजीद मिस्त्री, शकीलभाई, रज्जाकभाई, एजाज टेलर, मुसाभाई, समदभाई, आसिफखान, रशिदभाई, सलीम मेंबर, शेख अन्सार, शेख अली, फारख बेग मिर्झा, सलीमभाई भंगारवाले, शेख मोबीन युनूस मिर्झा, बबलू मिर्झा, सलीम खॉ, नुरभाई, आदीसह हजारोंच्या संख्येत मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी पोलिस विभागाचे वासुदेव डाबेराव, रमेश पाटील, रमेश जाधव, धंनजय ठाकरे, इंगोले, घुगे, पंजाब तडसे, महिला गृह रक्षक दलाच्या प्रमुख अनिता सहस्त्रबुद्धे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रिसोड : मुस्लीम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद शहरात उत्साहात साजरा झाला आहे. शहरामधील चांदणी चौक येथे मुस्लीम बांधव जमा होवून लोणी रोड स्थित ईदगाहकडे सकाळी १0 वाजता प्रस्थान झाले व सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास नमाज अदा करण्यात आली आहे. यावेळी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार ठाणेदार सुरेशकुमार राउत, अमोल नरवाडे, विष्णूपंत भुतेकर, प्रकाशराव वायभासे, प्रदीप पाटील, पोलीस पाटील गजानन कोरडे, प्रा. नजीर काझी, शेख जुल्फेकारभाई, बबनराव मोरे, गजानन हुंबाड, आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. ईदनिमित्त शहरामध्ये अनेक ठिकाणी खिर खुरमाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रमजान ईद उत्सव शांततेत पार पडला. यासाठी ठाणेदार राउत यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. मंगरुळपीर येथे रमजान ईद उत्साहात साजरी मंगरुळपीर : येथील दिवान साहब बाबा दग्र्यावर सकाळी ११ वाजता रमजान ईदची नमाज अदा केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक रउफ शेख, तहसीलदार बळवंत अरकराव, नायब तहसीलदार साळवे तलाठी आर.टी. खान आदी मान्यवर उपस्थित होते. या ईद मिलन शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल रहीम अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष अ. नईद यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रफीक बेग, रशीद बेग, अनवर जमील, सिद्दिकी, महम्मद जीयाखाँन लईक अहमद शेख मिर्झा इरशाद बेग मो. नदीम परवेज, अ.फईम, अ. अली पाशा महम्मंद आदिंनी पुढाकार घेतला होता. कारंजा : येथील ईदगाहवर २९ जुलै रोजी सकाळी १0 वाजता रमजान ईद निमित्त हजारो बांधवांच्या उपस्थितीत नमाज अदा करून परस्परांना शुभेच्छा देण्यात आल्यात. शहरातील गवळीपुरा मस्जिद, अस्ताना मस्जिद, जामा मस्जीद व शहरातील ईतर मस्जिद मध्ये आज मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. तसेच येथील इदगाह परिसरात सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी स्टेट बॅक ते बायपास परिसरात जाणारा रस्ता गर्दीने फुलून गेला होता. या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी कश्यप परिवारांच्यावतिने मुस्लीम बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. इदगाची नमाज काजी मोहम्मद इकबाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. अतिशय उत्साहाच्या वातावरणात ईद साजरी करण्यात आली. याप्रसंगी काझी रउफउल्ला यांनी उपस्थितांना उपदेश केला. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी, नेते मंडळी उपस्थित होती. तसेच मालेगाव व मानोरा येथेही ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शेकडो मुस्लिम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्यात.