जिल्हाभरात रमजान ईद उत्साहात
By Admin | Updated: June 27, 2017 09:34 IST2017-06-27T09:34:42+5:302017-06-27T09:34:42+5:30
रमजान ईदनिमित्त वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

जिल्हाभरात रमजान ईद उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रमजान ईदनिमित्त वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. जिल्हाभरातील मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.२८ मे पासून मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली होती. बहुतांश मुस्लीम बांधवांनी ह्यरोजाह्ण (उपवास) ठेवला होता. महिनाभराच्या कालावधीत धार्मिक उपक्रम, इफ्तार पार्टी आदी कार्यक्रम झाले. २६ जून रोजी विविध कार्यक्रमाने ह्यरमजानह्णची सांगता करण्यात आली. वाशिममधील इदगाहवर मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. रिसोड, मालेगाव, अनसिंग, आसेगाव, कारंजा, शिरपूर, मानोरा, मंगरूळपीर यांसह जिल्हाभरात हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.