गणरायांची सुरक्षा रामभरोसे!

By Admin | Updated: September 1, 2014 00:43 IST2014-09-01T00:37:31+5:302014-09-01T00:43:18+5:30

लोकमत स्टींग ऑपरेशन ; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुढाकाराची गरज.

Ramabrowsa security of the guards! | गणरायांची सुरक्षा रामभरोसे!

गणरायांची सुरक्षा रामभरोसे!

वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला धुमधडाक्यात प्रारंभ झाला, तर दुसरीकडे गणरायांच्या मूर्तीची सुरक्षितता जपण्याबाबत पोलिस यंत्रणा थोडी गाफीलच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहे. ३0 ऑगस्टच्या रात्री १0 ते १ वाजेदरम्यान लोकमत चमूने, वाशिम शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या मंडपांच्या पाहणीतून हा प्रकार समोर आला.
वाशिम शहरात ५२ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जात असल्याचा दावा पोलिस प्रशासन करीत असते. वाशिम शहरातील गणरायांच्या मूर्ती रात्रीच्या सुमारास किती सुरक्षित आहेत, रात्रीची पोलिस गस्त व पोलिस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची निगराणी कशी आहे, याची पडताळणी करण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या शहरातील विविध भागाच्या मंडपांची पाहणी करण्यात आली. शहरातील पाटणी चौक, रिसोड नाका, लाखाळा परिसर, अकोला नाका, बसस्थानक परिसर, सुभाष चौक, नगर परिषद चौक, गणेश पेठ आदी भागातील मंडपांची प्रकर्षाने पाहणी केली. यावेळी काही मंडपांच्या आसपासही कुणीच नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. अनेक मंडपाच्या आतमध्येही कुणीच नसल्याचे जाणवले. गणरायांच्या काही मूर्ती रामभरोसे असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. सुरक्षा व्यवस्था गाफील असल्याचा लाभ उठवत कुणाकडून मूर्तीबाबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कुणी माथेफिरूने मूर्तीची विटंबना केली, तर याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पृष्ठभूमीवर गणरायांच्या मूर्तीची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे.
दरम्यान गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शहरामधील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी आमच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. गणेश मंडळांना परवानगी देते वेळेस आम्ही त्यांना गणेश मूर्तीच्या सुरक्षिततेबाबत सूचना दिलेल्या आहेत. गणेश मूर्तीची सुरक्षा करणे हे त्या-त्या मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांची जबाबदारी असते. याव्यतिरिक्त शहरामध्ये प्रमुख ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट तैनात केले आहेत. यासोबतच रात्रीच्या वेळी पोलिस अधिकार्‍यांची गस्त शहरामध्ये सुरू असते, असे ठाणेदार संग्राम सांगळे यांनी सांगीतले.
*५२ गणेश मंडळे
वाशिम शहरात एकूण ५२ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. यापैकी काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे, तर काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अजूनही तत्त्परतेने कार्यान्वित झाली नसल्याची परिस्थिती आहे. संभाव्य अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षितता असणे गरजेचे आहे.
*कुठेही आढळले नाही पोलिस
वाशिम शहरात ङ्म्री गणेशोत्सवानिमित्त शहरात अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा अनुभव सकाळी नागरिकांना चौका-चौकातील पोलिसांवरून आला; मात्र रात्रीच्यावेळी लोकमतने स्टिंग केले त्यावेळी कोठेही पोलिस आढळले नाही.
**असे केले स्टिंग ऑपरेशन
वाशिम शहरातील स्थापन करण्यात आलेल्या ङ्म्री गणेशोत्सव मंडळातर्फे ङ्म्रींच्या सुरक्षिततेबाबत लोकमत टिमने रात्री ११.३0 वाजता स्टिंगला सुरुवात करण्यात आली. या स्टिंगमध्ये शहरातील ६ गणेश मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ङ्म्रींच्या सुरक्षिततेचा अभाव आढळून आला, तर दोन गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ङ्म्री गणेशाच्या सुरक्षिततेबाबत कमतरता आढळून आली. लाखाळा परिसरातील ४, रिसोड नाका परिसरातील शिक्षक कॉलनीदरम्यान एक व जुन्या जिल्हा परिषद रस्त्यावरील असे एकूण ६ गणेश मंडळातर्फे ङ्म्रींची स्थापना करण्यात आली. सुरक्षिततेबाबत कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. रात्रीच्या वेळी केवळ मंडपाचा पडदा झाकून होता. आतमध्ये कोणीही दिसून आले नाही.

Web Title: Ramabrowsa security of the guards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.