विद्युत उपकेंद्राचा वीजपुरवठा रामभरोसे

By Admin | Updated: September 26, 2014 00:29 IST2014-09-26T00:29:31+5:302014-09-26T00:29:31+5:30

किन्हीराजा उपकेंद्राची व्यथा : विद्युत पुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले.

Ram Bhabrose Electricity Station | विद्युत उपकेंद्राचा वीजपुरवठा रामभरोसे

विद्युत उपकेंद्राचा वीजपुरवठा रामभरोसे

कार्ली : किन्हीराजा ३३ के व्ही उपकेंद्रावरुन मिळणार्‍या गावांना थ्रीफेज व सिंगलफेज विद्युत पुरवठा मागील आठ दिवसांपासून कमालीचा अनियमित व अनिश्‍चित बनला आहे. या गावाना केवळ चार तासाची थ्रीफेज विद्युत पुरवठा देण्याचा घाट संबंधित विभागाने घातला आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसात व करपणार्‍या पिकांना पाणी देवुन वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या या भागातील हजारो कृषी मोटारपंपधारक बळीराजाचे हिरवे स्वप्न या निर्णयामुळे धुळीस मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
किहीराजा विद्युत उपकेंद्राअंतर्गत व विशेषता एरंडा फिडरअंतर्गत येणार्‍या कार्ली, किनखेडा, तोरनाळा, जोडगव्हाण, दुबळवल, गुंज, बोराळा, एरंडा, आदी गावांना मागील आठ दिवसापाूसन सतत थ्रीफेज, सिंगल फेजवरुन होणारा विद्युत पुरवठा, अनियमित व अनिश्‍चित, कमी दाबाचा व सततचा अप-डाउनचा बनला आहे. परिणामी पाणी पुरवठा, पिठ गिरणी बंद व अनियमीत झाल्याने ग्रामस्थांची पंचाईत झाली आहे.
किन्हीराजा विद्युत केंद्रावरुन होणार्‍या विद्युत पुरवठयावर मोठया प्रमाणात भार येत आहे. परिणामी ही समस्या निर्माण होत आहे त्यावर उपाय म्हणून आता तिन्ही फिडरवर चार तास थ्री फेज व रात्रीला सिंगलफेज विद्युत पुरवठा दिला जाईल एवढा मोठा भार सहन होत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले. मात्र जउळका उपकेंद्राचे काम पुर्णत्वास आले आहे, ते कार्यान्वीत झाल्यावर भार कमी होउन निश्‍चितच येणार्‍या काळात वीजभारनियमन कमी होईल, असे आश्‍वासन किन्हीराजा उपकेंद्राचे अभियंत्याने दिले आहे.

Web Title: Ram Bhabrose Electricity Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.