रॅलींमुळे वाशिम शहर दणाणले!
By Admin | Updated: October 14, 2014 01:46 IST2014-10-14T01:46:09+5:302014-10-14T01:46:09+5:30
अनेक उमेदवारांनी काढल्या रॅली.

रॅलींमुळे वाशिम शहर दणाणले!
वाशिम : विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या विविध उमेदवारांनी सोमवारी शहरातून रॅली काढत जाहीर प्रचाराचा समारोप केला. या आयोजनाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. एकामागून एक जाणार्या रॅलींमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २0 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यांनी सोमवारी सकाळपासूनच शहरात रॅलीचे आयोजन केले होते. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रचार रॅली काढून अंतिम दिवशी प्रचाराचा दणक्यात समारोप केला. वाशिम येथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आल्या तसेच इतरही उमेदवारांनी काढलेल्या रॅलीमुळे संपूर्ण शहर दणाणून गेले होते. सदर रॅलीमध्ये चारचाकी वाहने, मोटारसायकलसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी आपआपल्या वाहनांवर पक्षांचे झेंडे लावल्याने सर्वांंचे लक्ष वेधले गेले. विविध घोषणा देत संपूर्ण शहरातून रॅली काढून या उमेदवारांनी त्यांचा प्रचार केला.