ब्रम्हाकुमारी विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:26+5:302021-08-25T04:46:26+5:30
ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ...

ब्रम्हाकुमारी विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम
ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी रक्षाबंधन दिनाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयात सुरू असलेल्या मानवी कल्याणाच्या सेवार्थ तसेच ईश्वरीय गुणांची मनुष्याला असलेली आवश्यकता. याविषयी विश्लेषण करीत आध्यात्मिक ज्ञान हे आजच्या परिस्थितीनुसार सर्वांनी आत्मसात करुन ईश्वरी मार्गाने मार्गक्रमण करणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना दीदींनी राखी बांधून प्रसादाचे वाटप केले. कार्यक्रमाला सह संचालिका गीता दीदी, वंदना दीदी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला डॉ. विजयप्रसाद तिवारी, डॉ. अजय पाटील, डॉ. बोडखे, डॉ. रामानंद गटाणी, डॉ. विलास वाळले, डॉ. नानाराव अवचार, डॉ. भीमराव धांडे,रवी बोरा, डॉ. समीर काळे, पी. डी. पाटिल आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे ज्ञानार्थी राजकुमार गाडे, बोराटे,धीरज कुमार,चवरे यांनी पुढाकार घेतला. संचालन व आभार प्रदर्शन रवी अंभोरे यांनी केले.