वाशिमात राखी व्यवसायात ८ लाख रुपयांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:40+5:302021-08-26T04:43:40+5:30
वाशिम : गतवर्षी काेराेनामुळे राखी व्यावसायिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. यावर्षी मात्र माेठ्या प्रमाणात व्यवसाय हाेऊन जवळपास वाशिम ...

वाशिमात राखी व्यवसायात ८ लाख रुपयांची उलाढाल
वाशिम : गतवर्षी काेराेनामुळे राखी व्यावसायिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. यावर्षी मात्र माेठ्या प्रमाणात व्यवसाय हाेऊन जवळपास वाशिम शहरात ८ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती राख्यांचे ठाेक विक्रेते करण नेणवाणी यांनी दिली.
२२ ऑगस्ट राेजी रक्षाबंधन असल्याने शहरात १५ ऑगस्टपासूनच माेठ्या प्रमाणात दुकाने थाटली हाेती. परंतु यावर्षी राख्यांचे भाव १५ ते २० टक्के वाढल्याने व्यवसायात मंदी राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला हाेता. परंतु गतवर्षी काेराेनामुळे ४ ते साडेचार लाख रुपयांची उलाढाल झाली हाेती, यावर्षी त्या तुलनेत ८ ते साडेआठ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक देवराखी, लहान मुलांच्या राख्या विकल्या गेल्यात. जिल्ह्यात बनविण्यात आलेल्या राख्याच यावर्षी बाजारात माेठ्या प्रमाणात हाेत्या. दरवर्षी राजस्थानी राख्यांना पसंती असते, परंतु काेराेनामुळे अनेक व्यापाऱ्यांनी इतर प्रदेशातून राख्यांची मागणी न केल्याने जिल्ह्यात बनविण्यात येत असलेल्या राख्यांनाच नागरिकांना खरेदी करावे लागले. रक्षाबंधनानिमित्त देवराख्यांना सर्वात अधिक महत्त्व असल्याने या राख्यांची सर्वाधिक विक्री झाली. देवराख्यांची जवळपास विक्री ही उलाढालाच्या २५ टक्के म्हणजे २ लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यापाठाेपाठ लहान मुलांच्या राख्या विकण्यात आल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी धंद्यात तेजी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
............
देवराख्यांची २ लाख रुपयांच्या जवळपास उलाढाल
रक्षाबंधनामध्ये सर्वाधिक महत्त्व असलेल्या देवराख्यांची उलाढाल माेठ्या प्रमाणात झाली. ८ लाख रुपयांच्या उलाढालीमध्ये जवळपास २ लाख रुपयांच्या देवराख्या विकण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली
लहान मुलांच्या राख्यांची उलाढाल सव्वा लाख
लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टून राख्यांसह लाईटिंग राखीला माेठ्या प्रमाणात मागणी हाेती. जवळपास सव्वा लाख रुपयांच्या या प्रकारच्या राख्या विकण्यात आल्यात.
गतवर्षीपेक्षा यावर्षी माेठ्या प्रमाणात व्यवसाय झाला. वाशिम शहरात ८ लाख रुपयांच्या जवळपास उलाढाल झाली आहे. जुना मालही यावर्षी संपला.
- करण नेणवाणी, वाशिम