राकाँ- भाजपा उमेदवारात थेट लढत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:04 IST2017-09-12T20:04:58+5:302017-09-12T20:04:58+5:30
जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात थेट लढत होत आहे. १४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

राकाँ- भाजपा उमेदवारात थेट लढत !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात थेट लढत होत आहे. १४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होत असून एकंदरित १०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनु. जाती स्त्री प्रवर्गाचा अपवाद वगळता उर्वरीत दोन्ही प्रवर्गातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन उमेदवारांची अविरोध निवड झाली. अनु.जाती स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या करूणा कल्ले (वाशिम) व राकाँच्या संघमित्रा पाटील (मंगरूळपीर) यांच्यात आता सरळ लढत होत आहे. याच प्रवर्गातील वर्षा इंगोले (कारंजा) व प्रतिभा सोनोने (कारंजा) यांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची तर सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून ज्योती लवटे (मंगरूळपीर) यांची अविरोध निवड झालेली.
एका जागेसाठी भाजपा व राकाँ आमनेसामने उभे ठाकले असून, यामध्ये कोण बाजी मारतो, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. १० महिन्यांपूर्वी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथे नगर परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारीप-बमसं, भाजपाचे संख्याबळ बºयापैकी असून, राकाँला मंगरूळपीरचा अपवाद वगळता वाशिम व कारंजा येथे फारसे यश मिळाले नाही. या निवडणुकीत काँग्रेस, भारिप-बमसं व शिवसेनेचे मतदार कोणती भूमिका घेतात यावर राकाँ व भाजपाच्या उमेदवाराच्या यशापयश अवलंबून आहे.