राजुरा येथील आरोग्य उपकेंद्र वार्‍यावर !

By Admin | Updated: May 19, 2014 01:15 IST2014-05-17T21:24:17+5:302014-05-19T01:15:14+5:30

मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्‍या राजुरा आरोग्य उपकेंद्रातील गैरसोयी

Rajura's health subcategory War! | राजुरा येथील आरोग्य उपकेंद्र वार्‍यावर !

राजुरा येथील आरोग्य उपकेंद्र वार्‍यावर !

राजुरा : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्‍या राजुरा आरोग्य उपकेंद्रातील गैरसोयीचा भांडाफोड लोकमतने चव्हाटयावर आणताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. वरिष्ठांच्या निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोकराव शेंडे यांनी तातडीने आपल्या चमुसह राजूरा उपकेद्राला आकस्मिक भेट दिली असता उपकेंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. दैनदिन दौरा रजिस्टरही उपकेंद्रात न मिळाल्याने कोणता कर्मचारी कुठे आहे याबाबतची थांगपत्ताही वैद्यकीय अधिकार्‍यांना लागला नाही. कुलूपबंद उपकेंद्राची चावी शेजारच्या महिलेकडे मिळाल्याची धक्कादायक बाब अधिकार्‍या समक्ष उघडकीस आला. आदीवासी बहुजल लोकवस्ती असलेल्या व परिसरातील हजारो गोरगरीब जनतेच्या आरोग्याची नाडी असलेल्या राजुरा उपकेंद्रातील कर्मचार्‍यांना नियुक्ती पासूनच मुख्यालयी राहण्याची अँलर्जी आहे. त्यामुळे नागरिकांना रात्री - अपरात्री आरोग्य सेवेची गरज भासल्यास ऐपत नसतांनाही खासगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागतात.

Web Title: Rajura's health subcategory War!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.