शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा परिसरात उभारला ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:27 IST

वाशिम - अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक एस.एम.सी.इंग्लीश स्कुलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारुन पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्दे रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारुन पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.छतावरील वाहुन जाणारे पाणी पाईपलाईनव्दारे शोष खड्डा तयार करुन त्या शोष खडयामध्ये हे पाणी विंधन विहीरीमध्ये पुनर्भरण करण्यात आले. पुर्वी संस्थेला दरवर्षी उन्हाळ्यात एक ते दिड लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते, परंतु सदर हार्वेस्टींगमुळे पाण्याची व पैशाची बचत झालेली आहे.

वाशिम - अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक एस.एम.सी.इंग्लीश स्कुलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारुन पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचा मोठा फायदा या शाळेला झालेला आहे. पुर्वी संस्थेला दरवर्षी उन्हाळ्यात एक ते दिड लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते, परंतु सदर हार्वेस्टींगमुळे पाण्याची व पैशाची बचत झालेली आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. लाखाळा परिसरात नेहमीच पाणी टंचाई असते,तसेच दिवसेंदिवस पाण्याची पताळी ही खोल जात आहे. पाणी टंचाईचे चटके डिसेबर महिन्यातच जाणवायला सुरुवात होते. एकतर भुगर्भातील पण्याचा उपसा हा अधिक प्रमाणात होतो, पंरंतु त्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. यावर मात करीत संस्थाध्यक्ष प्रा.हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मिना उबगडे यांच्या सहकार्यातुन राष्ट्रीय हरित सेना योजनेंत हा प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी शाळेच्या परिसरात असलेल्या इमारतीच्या छतावरील वाहुन जाणारे पाणी पाईपलाईनव्दारे शोष खड्डा तयार करुन त्या शोष खडयामध्ये हे पाणी विंधन विहीरीमध्ये पुनर्भरण करण्यात आले. अशा प्रकारे पावसाच्या वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग करण्यात आला. या रेनवाटर हार्वेस्टींग प्रकल्पामुळे भविष्यात शाळेच्या परिसरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांनी केला. तसेच शासनाने अशा प्रकारच्या योजनांचा इतर लोकांनी आदर्श घेवुन आपल्या घरात, शाळेत कार्यालयात प्रकल्प राबवुन पाणी टंचाईवर मात करावी असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाWaterपाणी