शिरपूर येथे पावसाचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST2021-07-12T04:26:07+5:302021-07-12T04:26:07+5:30
शिरपूर परिसरात १८ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडला होता. परिसरातील पेरण्या २० जूनपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली ...

शिरपूर येथे पावसाचे पुनरागमन
शिरपूर परिसरात १८ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडला होता. परिसरातील पेरण्या २० जूनपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली परिणामत: पिके संकटात सापडली होती. उपलब्ध सिंचन सुविधातून पिकांना पाणी देणे सुरू झाले होते. तब्बल दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जिल्ह्यात चार-पाच दिवसापासून काही भागात पाऊस पडत असताना शिरपूर परिसरात मात्र पावसाचे पुनरागमन झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली होती. अशातच १० जुलैच्या मध्यरात्रीनंतर शिरपूर येथे जोरदार आगमन झाले. ११ जुलैच्या सकाळपर्यंत तब्बल ९१ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. शिरपूर येथे १ जूनपासून एकूण ४६४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.