कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

By Admin | Updated: May 29, 2017 01:15 IST2017-05-29T01:15:51+5:302017-05-29T01:15:51+5:30

कारंजा: तालुक्यात २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे ढग दाटते. आणि वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

Rainfall with torrential winds in the Karanja taluka | कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा: तालुक्यात २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे ढग दाटते. आणि वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
कारंजा शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने नागरिकांची तांराबळ उडाली. कारंजा तालुक्यातील यावर्डी येथे तर वादळीवाऱ्यामुळे घरावरील टिनपत्रे उडून घरांची पडझड झाली. तसेच धनज बु, परिसरात भामदेवी येथे गारपिट व जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या, यामुळे ग्रामीण भागात घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तसेच तालुक्याती उंबर्डाबाजार व कामरगाव परिसरात सुध्दा पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Rainfall with torrential winds in the Karanja taluka