शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर ...

ठळक मुद्देदहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत .ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे . येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास हातचे पीक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ  फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर परिसरातील शेतकरी आनंदीत होता . पेरण्या योग्यवेळी अडथळाविना पार पडल्या त्यानंतर मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने काही प्रमाणात जास्त पाण्यामुळे तुरीच्या पिकांना फटका बसला, मात्र गेल्या  दहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत . ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे .       ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी थांबलेला पाऊस धोकादायक ठरत आहेत.  जुलै महिन्यात सतत ८ दिवस पावसाची रिपरिप सुरु होती, त्या समाधानकारक पावसावर परिसरातील शेतकºयांची पिके थोडी बहरली . उघडीप मिळाल्यावर महागडी किटकनाशक औषधी घेवून मोठ्या प्रमाणावर फवारण्या केल्या त्या निरर्थक ठरत आहेत.परिसरात खरीप हंगामावर शेतकºयांची भिस्त आहे.  मागील तीन चार वषार्पासून सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होत नसल्याने आवश्यक त्या प्रमाणात रब्बी पिकांचा लाभ घेण्यापासुन शेतकºयांना वंचीत रहावे लागत आहे .  येत्या आठ दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हलक्या जमीनीवरील पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.   अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग ८ ते १० दिवसापासून उघडीप दिल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.पावसासाठी शेतकरी देवाकडे साकडे घालतांना दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास शेतकºयांचे हातचे पीक जाण्याची  शक्यता नाकारता येत नाही.तुषार सिंचनाचा आधारगत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून पावसाची प्रतिक्षा करीत आहे. तर ज्या शेतकºयाकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी आपले पिक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतांना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्थाच नाही अश्या शेतकºयांच्या हातचे पीके जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस