वाशिम जिल्हय़ात पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 12, 2016 02:50 IST2016-06-12T02:50:42+5:302016-06-12T02:50:42+5:30
वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, रिसोड आदी तालुक्यांमध्ये चांगला पाऊस.

वाशिम जिल्हय़ात पावसाची हजेरी
वाशिम: शेतकर्यांसह सर्वांंनाच आतुरता लागून असलेल्या पावसाने जिल्हय़ात शनिवार, ११ जून रोजी सर्वदूर हजेरी लावली. या पावसामुळे शेतकर्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झाल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, रिसोड आदी तालुक्यांमध्ये आज चांगला पाऊस झाला. वाशिम तालुक्यातील तोंडगावनजीक वाहणारी नदी या पावसामुळे वाहती झाल्याची माहिती आहे. इतर ठिकाणीदेखील दमदार पाऊस झाल्याने खरिपातील पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तोंडगाव नदी काठोकाठ भरून वाहल्याने नागरणीसाठी गेलेले ट्रॅक्टर अडकले होते.