वाशिम जिल्हयात सर्वत्र पाऊस
By Admin | Updated: January 2, 2015 01:07 IST2015-01-02T01:07:01+5:302015-01-02T01:07:01+5:30
गारपीटीमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान.

वाशिम जिल्हयात सर्वत्र पाऊस
वाशिम : जिल्हयात १ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान अचानक पावसाचे आगमन झाले. जिल्हयात सरासरी ७.१७ पाऊस पडला. यापावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी या भागात रात्री ११ वाजताच्या दरम्यान बोराएवढी गारा पडल्याने मोठया प्रमाणात नुकसान संभवते. जिल्हयात १ डिसेंबर रोजी सर्वाधिक पाऊस मानोरा तर त्या पाठोपाठ कारंजा तालुक्यात झाला. मात्र मालेगाव तालुक्यामध्ये मेडशीसह परिसरात गारा पडल्याने या तालुक्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले. किन्हीराजा परिसरामध्येही गारपीट झाल्याने हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. मगरूळपीर तालुक्यामध्ये पपईच्या बागेचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्यांनी तूरीच्या पिकांची काढणी केली नाही अशाही शेतकर्यांचे नुकसान या पावसामुळे झाले आहे. २ डिसेंबर रोजीही वाशिम, मालेगाव परिसरात पावसाचे आगमन झाले. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. १ डिसेंबर रोजी जिल्हयात प्रत्यक्ष पडलेल्या पावसामध्ये वाशिम तालुक्यात ४ मि.मि., मालेगाव ३ मि.मि., रिसोड ५ मि.मि., मंगरूळपीर ८ मि.मि., मानोरा १३ मि.मि., कारंजा १0 मि.मि.असे एकूण जिल्हयात ४३ मि.मि. असा एकूण सरासरी ७.१७ पाऊस पडला. जिल्हयात १ जून २0१४ ते १ जानेवारी २0१५ पर्यंंंंत ५९५. ९३ मि.मि. पाऊस पडला असल्याची पर्जन्यमानाच्या अहवालात नोंद आहे.