मंगरूळपीर व रिसोड तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस
By Admin | Updated: April 10, 2015 02:13 IST2015-04-10T02:13:24+5:302015-04-10T02:13:24+5:30
सुसाट वार्यामुळे अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोसळले.

मंगरूळपीर व रिसोड तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस
मंगरूळपीर(वाशिम): तालुक्यातील शेलूबाजार येथे सायंकाळी ६ वाजता जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या वादळी पावसाने व्यापारी तथा शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली. क्षणभरात जिकडे-तिकडे पावसाचे डबके साचून गेले, तर सुसाट वार्यामुळे अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोसळले. वादळी पावसामुळे शेलूबाजार येथील महादेव मंदिरासमोरील वटवृक्ष उन्मळून मंदिरावर पडला. तसेच संपूर्ण चौक काही क्षणात जलमय होऊन गेले होते. काही कळायच्या आत धो-धो पाऊस पडला. एकच तारंबळ उडाली. तसेच शिरपूर येथे व रिसोड तालुक्यातील वसारी, दापुरी, केशवनगर, मसला व किनखडा येथेही वादळ वार्यासह पाऊस बरसला. यामध्ये आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.