शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाशिम जिल्ह्यात पावसाची विश्रांती; शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 18:47 IST

Rain relief in Washim district; Farmers worried : शेतकरी चिंतातूर झाला असून, दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

वाशिम : गत आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके संकटात सापडत आहेत. परिणामी, शेतकरी चिंतातूर झाला असून, दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होणार आहे. आतापर्यंंत जवळपास ६७ टक्के पेरणी आटोपली आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस नसल्याने हलक्या जमिनीतील पिके कोमेजून जात आहेत. मंगरूळपीर, रिसोड, मानोरा तालुक्यातील काही भागात पाऊस झाला तर वाशिम, कारंजा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. सर्वाधिक मंगरूळपीर तालुक्यात २३.७ मिमी झाला. वाशिम तालुक्यात १.२ मीमी, रिसोड तालुक्यात ०.४, मानोरा तालुक्यात ९.३ तर कारंजा तालुक्यात ३.८ मीमी पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. बिजांकूर जमिनीबाहेर आले असून, पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. वाशिम व कारंजा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस असल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.

 

 आतापर्यंत झालेला एकूण पाऊसतालुका पाऊस (मीमी)वाशिम १८४रिसोड २२५

मालेगाव २०४मंगरूळपीर २४२

मानोरा २५७कारंजा १३७

 दहा दिवसांपूर्वी सर्व पेरणी आटोपली आहे. आता पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात आहेत. येत्या दोन, तीन दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे सावट आहे.- पांडुरंग सोळंके,शेतकरी, नागठाणा ता.वाशिम 

गतवर्षीच्या नैसर्गिक संकटातून सावरत यंदा शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. ९० टक्के पेरणी आटोपली आहे. आता पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे.- हरिष चौधरीशेतकरी, पार्डीटकमोर ता.वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती