बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:07+5:302021-02-05T09:27:07+5:30
वाशिम : अकाेला रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे तसेच दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. वाशिम ...

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
वाशिम : अकाेला रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे तसेच दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. वाशिम येथे अपघातील मृत्यू झाल्याची नाेंदसुद्धा अकाेला येथेच करण्यात येत असून सन २०१९ ते २०२० मध्ये एकूण १५ अपघाती मृत्यूची नाेंद आहे. यामधील ७ मृतांच्या नातेवाइकांच्या शाेधासाठी पाेलिसांना चांगलीच दमछाक करावी लागली. अखेर ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही , त्यांच्यावर रेल्वे पाेलिसांनी अंत्यसंस्कार केले. २०१९ मध्ये अपघाती १२ मृत्यू झालेल्यांपैकी सातजणांची ओळख पटली, तर २०२० मध्ये तीन अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी केवळ एकाचीच ओळख पटली हाेती. त्यामुळे अनाेळखी सात मृतदेहांवर रेल्वे पाेलिसांनी अंत्यसंस्कार केले. वाशिम येथे अपघातील मृत्यूची नाेंद हाेत नसून, अकाेला येथे करण्यात येते.
..............
सात मृतदेहांची ओळख पटली नाही
सन २०१९ मधील ५ व २०२० मधील २ अशा एकूण ७ मृतदेहांची ओळख रेल्वे पाेलिसांना पटली नाही.
सन २०१९ मधील ७ व २०२० मधील १ अशा एकूण ८ बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यास रेल्वे पाेलिसांना यश आले.
२०१९-२० मध्ये एकूण १९ अपघात घडले. यामध्ये ४ किरकाेळ स्वरूपाचे, तर १५ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.
..............
वाशिम येथे रेल्वे अपघात, अपघाती मृत्यूची नाेंद अकाेला येथे करण्यात येते. अकाेला व वाशिम रेल्वे स्थानकावर एकूण १५ अपघाती मृत्यू झाले. यामध्ये अनाेळखी मृतदेहांवर रेल्वेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या खिशात किंवा जवळ ओळखपत्र असल्यास लवकर शाेध लागताे.
- किरण साळवे, रेल्वे पोलीस निरीक्षक