‘रेल देखो -बस देखो’

By Admin | Updated: August 9, 2014 22:43 IST2014-08-09T22:02:47+5:302014-08-09T22:43:16+5:30

वेगळया विदर्भासाठी अभिनव आंदोलन

'Rail Watch - Just See' | ‘रेल देखो -बस देखो’

‘रेल देखो -बस देखो’

वाशिम: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता ९ ऑगस्ट हुतात्मा दिनाच्या पावनपर्वावर संपूर्ण विदर्भात रेलदेखो बस देखो असे अनोखे आगळे वेगळे वाशिम जिल्हा आंदोलन जनमंच लढा विदर्भाचा माध्यमातुन जुगलकिशोर कोठारीच्या नेतृत्वात आयोजित केले होते. या आंदोलनाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळयास हारार्पणाने केली मोटार सायकल रॅलीव्दारा बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळयास हारार्पण नंतर एस.टी.स्टँन्डवर बस देखो आंदोलन सुरु झाले या मध्ये बस स्टँडवरील प्रत्येक प्रवाशांना त्यामध्ये पुरुष, महिला, बालक यांचा समावेश होता. जय विदर्भ विदर्भ बंधन प्रेमाचा धागा बांधण्यात आला जय विदर्भची टोपी घालुन प्रत्येकास वेगळया विदर्भ का हवा याचे महत्व प्रत्येक सहभागी कार्यकर्त्यांनी पटवून दिले. लांब पल्ल्याच्या बसेस मध्ये चढून प्रत्येकास विदर्भ बंधन बांधण्यात आले संपूर्ण परिसर जय विदर्भ, वेगळा विदर्भच्या घोषणेसह लोकांच्या उत्स्फुर्त पणे प्रचंड सहभाग प्राप्त झाला यानंतर रेल्वेस्टेशन येथे नांदेड नागंल ट्रेनवर सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकास विदर्भ बंधनाची प्रेमळ गाठ मारली यामध्ये विदर्भ आंदोलन समितीच्या पदािकधयाच सक्रीय सहभाग होता याप्रसंगी जुगलकिशोर कोठारी, अध्यक्ष व्यापारी मंडळ वाशिम दत्तराव धांडे विदर्भवादी नेते गोपाळराव आटोटे गुरुजी अध्यक्ष पीरीपा, नारायणराव विभुते, राम पाटील डोरले अध्यक्ष विदर्भ, आंदोलन समिती बाळाभाउ इन्नाणी, गुरुमुखसिंग गुलाटी, यांचे यथोचित प्रेरणादायी भाषण झाली. या शांतीपुर्ण नविन्याने भरलेल्या आंदोलनाला यशस्वी करण्याकरीता जुगलकिशोर कोठारी वाशिम जिल्हा जनमंच चंद्रकांतदादा ठाकरे उपाध्यक्ष नेतृत्वात राजुभाउ वानखेडे, न.प.सदस्य , गुरुमुखसिंग गुलाटी, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरु , गोपालराव आटोटे, बाळाभाउ इन्नाणी, रमेशचंद्र बज, दिलीपभाई देवाणी, दौलतराव हिवराळे, धनंजय हेंद्रे, डॉ.सावके, परमेश्‍वर अंभोरे, गोविंद वर्मा, मनिष मंत्री, अँड.सुरेश टेकाळे, सचिन करवा, मुन्ना राठी, मोहनराव चौधरी, रवि पेंढारकर, राजेश सिसोदिया यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. आभार राम पाटील डोरले यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Rail Watch - Just See'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.