गावठी हातभट्टय़ांवर छापे; आठ जणांवर गुन्हे
By Admin | Updated: March 12, 2017 01:49 IST2017-03-12T01:49:14+5:302017-03-12T01:49:14+5:30
वाशिम जिल्हय़ात ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; ८ जणांवर गुन्हे दाखल.

गावठी हातभट्टय़ांवर छापे; आठ जणांवर गुन्हे
वाशिम, दि. ११- जिल्हय़ात १७ ठिकाणी गावठी दारूच्या भट्टय़ांवर गत १0 दिवसांत केलेल्या कारवाईत ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यासह ८ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती अधीक्षक पराग नवलकर यांनी शुक्रवारी दिली.
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला, वाशिम दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मंगरुळपीर यांनी १ ते १0 मार्च या कालावधीत मोहगव्हाण, उकळीपेन, पोहा, महागाव, भर जहागीर, केशवनगर, येथे १७ ठिकाणी धाडी टाकून ८ वारस व ९ बेवारस गुन्हे नोंदवून मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई.एफ नुसार विलास चव्हाण, नामदेव पवार, शेषराव चव्हाण, योगेश गायकवाड, धोंडू इंगळे, मधुकर जैताडे, मारोती धेत्रे, अनिल धोत्रे या आठ जणांना अटक करीत ९६ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४१0५ लीटर मोह सडवा नष्ट करण्यात आला. या कारवायांमध्ये प्रभारी निरीक्षक एन.के. सुर्वे, डी.ओ. कुमोट, के..ए. वाकपांजर, रणजित आडे, स्वप्नील लांडे, नितीन चिपडे, संजय मगरे, ललीत खाडे, नवृत्ती तिडके, मस्के, बाळू वाघमारे आदींनी सहभाग नोंदविला.