उमरी खुर्द येथे दोन ठिकाणी दारू अड्यावर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:40 IST2021-04-17T04:40:13+5:302021-04-17T04:40:13+5:30

उमरी खुर्द येथिल अनिता भीमराव इंगोले यांचे राहते घरि छापा मारला असता ५० लीटर गावठी दारू, ३०० लीटर सड़वा ...

Raids on liquor dens at two places at Umri Khurd | उमरी खुर्द येथे दोन ठिकाणी दारू अड्यावर छापे

उमरी खुर्द येथे दोन ठिकाणी दारू अड्यावर छापे

उमरी खुर्द येथिल अनिता भीमराव इंगोले यांचे राहते घरि छापा मारला असता ५० लीटर गावठी दारू, ३०० लीटर सड़वा मोहा माच असा एकूण ४० हजार १०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. तसेच अरविंद अंबादास राठोड यांचे राहते घरी छापा टाकला असता २० लीटर हातभट्टीची दारू, २०० लीटर सड़वा मोहा माच असा एकूण २२ हजार १०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. दोन्ही व्यक्ति विरुद्ध मानोरा येथे गुन्हे नोंदविन्यात आले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या मार्गादर्शनात पोलिस उपनिरीक्षक खंडारे, पंडित, भगवान गावंडे, सुनील पवार, प्रशांत राजगुरु, मुकेश भगत, राजेश गिरी, निलेश इंगळे, किशोर खंडारे, राम नागुलकर ,तेहमीना शेख,

रेश्मा ठाकरे यांनी ही कारवाइ केली.

Web Title: Raids on liquor dens at two places at Umri Khurd