औषध दुकानांवर छापे!

By Admin | Updated: April 22, 2016 02:15 IST2016-04-22T02:15:20+5:302016-04-22T02:15:20+5:30

फार्मासिस्ट नाही; अन्न व औषध प्रशासनाने घेतली दखल.

Raids in the drug shops! | औषध दुकानांवर छापे!

औषध दुकानांवर छापे!

धनंजय कपाले / वाशिम
वाशिम शहरात नाममात्र दराने भाड्याच्या परवान्यावर अप्रशिक्षित व्यक्तींकडून औषधांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब ह्यलोकमतह्णने ५ एप्रिल रोजी ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमधून उजागर केली होती. या वृत्ताची अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाने दखल घेऊन २१ एप्रिलला मेडिकल दुकानावर छापे टाकून दोषींवर कारवाई करण्यात आली.
औषध दुकानदार हा स्वत: फार्मासिस्ट असावा किंवा फार्मासिस्ट असलेला कर्मचारी ठेवून औषध विक्री करावी, असे बंधनकारक आहे; मात्र फार्मासिस्ट नसतानाही वाशिम शहरात औषध दुकानातून औषधे देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब ५ एप्रिल रोजी ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण दरम्यान उघडकीस आली.
या वृत्ताची अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाने दखल घेऊन दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातील पथकामध्ये सहायक आयुक्त आर. एल. पाटील, अमरावती विभाग सहआयुक्त ए.पी. निखाडे, औषध निरीक्षक पी.बी. अस्वार यांच्यासह कर्मचार्‍यांचा समावेश होता. अन्न व औषध प्रशासनाने शहरात विविध मेडिकल दुकानावर छापे टाकले असता, बोगस परवानाधारकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली. आज केलेल्या कारवाईमध्ये अनेक दुकानदारांचे परवाने निलंबित होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाडेतत्त्वावर दिलेल्या परवानाधारकांवरही काय कारवाई होते, याकडेसुद्धा जिल्हावासीयांसह फार्मासिस्ट संघटनेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Raids in the drug shops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.