मोहगव्हाण येथे गावठी दारूभट्ट्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:41+5:302021-03-22T04:37:41+5:30

पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील मोहगव्हाण येथे सहायक पोलीस निरीक्षक पोहेकर, पोलीस उपनिरीक्षक इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील नदीच्या ...

Raid on village distilleries at Mohgavan | मोहगव्हाण येथे गावठी दारूभट्ट्यांवर धाडी

मोहगव्हाण येथे गावठी दारूभट्ट्यांवर धाडी

पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील मोहगव्हाण येथे सहायक पोलीस निरीक्षक पोहेकर, पोलीस उपनिरीक्षक इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या ई-क्लास जमिनीवर सुरू असलेल्या गावठी दारूभट्ट्यांवर धाडी टाकल्या. यावेळी दारू गाळप करणारे काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत नजीर रशीद नंदावाले, रा. मोहगव्हाण याच्याकडून अंदाजे ५० हजार २०० रुपये किमतीचा १२०० लीटर मोहामाच व २२ लीटर गावठी, तसेच बाजूला अंदाजे ३३ हजार ७०० रुपयांचा ८०० लीटर मोहामाच व १७ लीटर गावठी दारू आणि त्याच परिसरात अंदाजे ३६ हजार ५०० रुपयांचा ९०० लीटर मोहामाच व ५ लीटर गावठी दारू मिळून एकूण १ लाख २० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट करण्यात आला. पळून गेलेल्या लोकांची नावे उस्‍मान हुसेन नंदावाले व तुकड्या खैरू नौरंगाबादी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांवर अनसिंग पोलिसांत दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on village distilleries at Mohgavan