विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात

By Admin | Updated: November 6, 2016 19:36 IST2016-11-06T19:36:51+5:302016-11-06T19:36:51+5:30

यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे.

Rabi season danger due to electricity problem | विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात

विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगाम धोक्यात

>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बीच्या हंगामात सिंचनाला आधार मिळणार असला तरी, विजेच्या विविध समस्यांमुळे हा हंगाम संकटात सापल्याची स्थिती जिल्ह्यात दिसत आहे. 
मागील तीन वर्षांत प्रथमच चांगला पाऊस पडला. जिल्हाभरातील जलस्त्रोत काठोकाठ भरले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही वाढली आहे. पण विज वितरणकडून होणारे अघोषित भारनियमन, विविध कारणांमुळे सतत खंडीत होणारा विज पुरवठा, तसेच कूचकामी रोहित्रांमुळे शेतकऱ्यांना पिके जगविणेच कठीण झाले आहे. मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शेतकरी त्याचा उपयोग विजेअभावी करू शकत नाहीत. मागील तीन वर्षांत याच कारणांमुळे दुष्काळाची झळ अधिक तीव्र झाली होती, कारण थोडथोडके पाणी असल्याने त्या आधारे पिके  तगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना विज वितरणच्या हलगर्जीमुळे अडथळा आला होता. परिणाम तीन वर्षांत दाहक उन्हाच्या फटक्याने उभी णही पोषक पिके डोंळ्यादेखत करपत असल्याचे शेतकºयांनी पाहिले. आता यंदा तीन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वातावरअसून, कृषी विभागाच्यावतीने तब्बल १ लाख ३० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली. हे प्रमाण गतवर्षी पेक्षा दीडपट आहे; परंतु विज वितरणच्या हेळसांडीमुळे हा हंगाम विज पुरवठ्या अभावी संकटात सापल्याचे दिसत आहे. 
वाशिम जिल्ह्यात रोहित्र जळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. दररोज कुठल्या तरी गावात एक रोहित्र जळून निकामी होत आहेच. यामुळे संबंधित गाव किंवा शेतशिवारातील विज पुरवठा खंडीत होतो. हा विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रोहित्र बसविणे गरजेचे आहे; परंतु विज वितरणकडे पुरेशा प्रमाणात रोहित्रच उपलबध नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीडशेच्यावर रोहित्र बिघडल्यामुळे कुठे गाव अंधारात आहे, तर कुठे शेतकऱ्यांचे सिंचन रखडले आहे; परंतु ही समस्या दूर करण्यासाठी विज वितरणकडे रोहित्रच उपलब्ध नाहीत. या संदर्भात अधिकारी कर्मचारीही फारसे गंभीर नसल्याने जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत

Web Title: Rabi season danger due to electricity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.