लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST2021-05-13T04:41:48+5:302021-05-13T04:41:48+5:30

कारंजा लाड : ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देणे सुरू असून, १२ मे रोजी कारंजा शहरात भर उन्हात ...

Queues in the sun for vaccinations; What if there is a heat stroke? | लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?

लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?

कारंजा लाड : ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देणे सुरू असून, १२ मे रोजी कारंजा शहरात भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन तासांत ताटकळत बसावे लागले. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात झाला तर? असा प्रश्न ज्येष्ठांमधून उपस्थित होत असून, सकाळी ७ ते ११ या वेळेत लसीकरण मोहीम राबवावी, असा सूर ज्येष्ठ नागरिकांमधून उमटत आहे.

कारंजा शहरात विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी १०० डोस, तर मूलजी जेठा हायस्कूूल येथे २५० डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही ठिकाणी दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी टोकन वाटण्यात येत आहे. टोकन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहतात. ३५० लस घेण्यासाठी जवळपास ७०० नागरिक रांगेत उभे राहतात. त्यानंतर दोन तासांनी रांगेत असणाऱ्यांना टोकन वाटण्यात येते. नंतर पुन्हा अडीच तासाने म्हणजे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोग्य कर्मचारी आल्यानंतर लसीकरणास सुरुवात होते. ऊन अंगावर घेऊन लस घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

नागरिकांना तीन तासांपेक्षा उन्हात बसून किंवा ज्या ठिकाणी सावली असेल त्या ठिकाणी बसावे लागते. त्यामुळे लसीकरणाची वेळ सकाळी ७ ते ११ या वेळेत करावी, अशी मागणी अक्षय देशमुख यांच्यासह ज्येष्ठांनी मंगळवारी केली.

Web Title: Queues in the sun for vaccinations; What if there is a heat stroke?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.