शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

अखेर शिक्षकांच्या निवड, वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 5:39 PM

वाशिम : १२ व २४ वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्याचा मुहूर्त अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला गवसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १२ व २४ वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्याचा मुहूर्त अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला गवसला आहे. प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठण केले असून, या समितीला २९ मार्चपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेंतर्गत १२ व २४ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. याबाबत संबंधित शिक्षकांकडून वारंवार जिल्हा परिषद स्तरावर मागणी करण्यात येत होती. आता वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून, पात्र शिक्षकांना चटोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्रा.) गजानन डाबेराव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रस्तावांची छाननी व पडताळणी या समितीमार्फत करण्यात येणार असून, ही प्रक्रिया येत्या २९ पर्यंत पूर्ण करून आपला अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी ३१ मे २००१ आणि २३ आॅक्टोबर २०१७ च्या निर्णयातील तरतुदींचे तंतोंतत पालन करून प्राप्त प्रस्तावांची छाननी व पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या २९ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यात येईल.-गजानन डाबेरावप्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक