बसस्थानकातील रस्त्याचा प्रश्न रेंगाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:25+5:302021-02-05T09:24:25+5:30
............... राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती मेडशी : परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लॉकडाऊन खुला झाल्यानंतर गती प्राप्त झाली आहे. ...

बसस्थानकातील रस्त्याचा प्रश्न रेंगाळला
...............
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती
मेडशी : परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लॉकडाऊन खुला झाल्यानंतर गती प्राप्त झाली आहे. काही ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आल्याने वाहनधारकांची सोय झाली आहे. उर्वरित कामही गतीने पूर्ण करण्याची मागणी शे. इस्माईल यांनी केली आहे.
................
हरभरा पिकाच्या उत्पन्नात वाढ
जऊळका रेल्वे : सध्या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पीक काढून घेण्याची प्रक्रिया राबविणे सुरू केले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे एकरी उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
.................
केंद्रीय विद्यालय अद्याप बंदच
वाशिम : जिल्ह्यातील इतर शाळांप्रमाणे वाशिम येथील केंद्रीय विद्यालयही सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते; मात्र, कोरोना चाचणी अहवालात तीन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने सध्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
..................
ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा ठप्प
किन्हीराजा : भारत नेट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र इंटरनेट जोडणीची कामे संथ गतीने सुरू असल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा अद्याप ठप्पच असून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
................
कबड्डी स्पर्धेसाठी निवड चाचणी
वाशिम : जय किसान विद्यालय, फाळेगाव (व्यवहारे) येथे ३१ जानेवारीला वाशिम जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनतर्फे कबड्डी स्पर्धेसाठी सब ज्युनियर निवड चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ नवघरे, सचिव भागवतराव महाले यांनी दिली.
................
क्रीडा स्पर्धा गुणांचा मिळणार लाभ
वाशिम : कोरोनामुळे स्पर्धा होऊ न शकल्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांचे जादा गुण (ग्रेस मार्क) दिले जाणार आहेत. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी त्यास हिरवी झेंडी दिल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी ३१ जानेवारीला दिली.
................
पीडित व्यक्तींना मदतीची मागणी
वाशिम : अॅट्रॉसिटी पीडित व्यक्तींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे, आदी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.
....................
खड्डे बुजविल्याने वाहनधारकांची सोय
वाशिम : पुसद नाका ते पोस्ट ऑफीस चौक या मुख्य रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविण्याचे काम शनिवारी करण्यात आले. यामुळे जड वाहतूक सुरळीत होण्यासह दुचाकी वाहनधारकांची सोय झाली आहे.
................
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
मालेगाव : वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. अनेकजण खरीप व रबी हंगामात पिकांची लागवड करत असल्याने वृक्षलागवड वांध्यात सापडल्याचे दिसून येत आहे.
................
पेट्रोलच्या दरात वाढ; ऑटोचालक अडचणीत
वाशिम : पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत चालली असून जनजीवन यामुळे विस्कळित झाले आहे. प्रवासी वाहतूक करणारे तीनचाकी ऑटोचालक या समस्येमुळे अडचीत सापडल्याची प्रतिक्रिया राहुल गायकवाड याने व्यक्त केली.
................
नागरिकांना पडला ‘मास्क’चा विसर
वाशिम : कोरोनाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. असे असताना फिजीकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहे. यासह नागरिकांना ‘मास्क’चाही विसर पडल्याचे चित्र रविवारी वाशिमच्या आठवडे बाजारात पाहावयास मिळाले.
...............
नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
वाशिम : येथून पुसदकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी रविवारी खडा पहारा देऊन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. ही प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.