नोव्हेंबर महिन्याचे अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:09 IST2017-10-27T16:06:57+5:302017-10-27T16:09:16+5:30

वाशिम : महाराष्ट्र शासनाचे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नोव्हेंबर २०१७ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिरमाण निश्चित करण्यात आले आहे. 

The quantum of food grains allotted to the month of November is fixed! | नोव्हेंबर महिन्याचे अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित !

नोव्हेंबर महिन्याचे अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित !

ठळक मुद्देसार्वजनिक वितरण व्यवस्था अन्नधान्य वेळेवर घेऊन जाण्याचे आवाहन

वाशिम : महाराष्ट्र शासनाचे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नोव्हेंबर २०१७ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिरमाण निश्चित करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१४ अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका २१ किलो गहू व १४ किलो तांदुळ आणि एपीएल शेतकरी लाभार्थींना प्रति व्यक्ती ४ किलो गहू व १ किलो तांदुळ याप्रमाणे नोव्हेंबर २०१७ करीता वाटप परिमाण निश्चित केलेले असून सर्व लाभार्थींसाठी धान्याचे विक्री दर हे गहू दोन रुपये प्रती किलो तर तांदूळ तीन रुपये प्रती किलो या प्रमाणे आहेत.

जिल्ह्यातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना प्रति कार्ड १ किलो साखर किरकोळ विक्री २० रुपये असा आहे. जिल्ह्यात वितरीत होणारे केरोसीन दर तालुकानिहाय वेगवेगळे आहेत. वाशिम तालुक्यासाठी २३.७० रुपये, मालेगाव २३.५५ रुपये, रिसोड २३.८० रुपये, मंगरूळपीर २३.६०, मानोरा २३.७५ व कारंजा २३.७० रुपये लिटर याप्रमाणे दर निश्चित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्य पुरवठ्याचे परिमाण व शासकीय किंमतीनुसार धान्य व रॉकेल खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले.

Web Title: The quantum of food grains allotted to the month of November is fixed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार