कापूस बियाण्यांची गुणवत्ता घसरली
By Admin | Updated: February 5, 2015 01:29 IST2015-02-05T01:26:37+5:302015-02-05T01:29:27+5:30
पाच वर्षात १९ हजार नमूणे अप्रमाणित.

कापूस बियाण्यांची गुणवत्ता घसरली
बुलडाणा: कोणत्याही पिकांपासून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी बियाणे शुद्ध व दज्रेदार असावे लागते. या मुलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत गेल्या पाच वर्षात १ लाख ८१ कापूस बियाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ हजार ७३७ बियाणे अप्रमाणीत ठरविण्यात आले आहे.
खरीपाचा हंगाम सुरु होताच शेतकरी पेरणीसाठी कापस बियाणे बाजारातून खरेदी करतात. अनेकदा शेतकरी स्वत:चे चांगणे बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवतात. प्रसंगी ते इतरांनाही विकत देतात. सामान्य शेतकर्यांनी इतर शेतकर्यांना देऊ केलेल्या बियाण्यांची पत प्रयोगशाळेत तपासलेली नसते. या बियाण्यांच्या दर्जाबाबत कोणतीही खात्री नसते. केवळ एकमेकांच्या विश्वासावर हे बियाणे खरेदी केले जाते. म्हणून अशा बियाण्यांची पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. दज्रेदार बियाणे शेतकर्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने बियाणे कायदा करुन त्याअंतर्गत बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा, बीज परिक्षण प्रयोगशाळा पूणे, परभणी व नागपूर येथे स्थापन करण्यात आल्या आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रामुख्याने बियाण्याची भौतिक शुद्धता व उगवण शक्ती, कायद्यांतर्गत काढलेल्या नमुन्याची आवश्यकतेनुसार अनुवंशिक शुद्धता आणि बियाण्यातील आद्र्रता, ओलावा व स्वास्थ या बाबी तपासता येतात. या निकषावर कापूस बियाणे प्रयोगशाळेत तपासण्यात आली.