प्रा. गांजरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:53 IST2017-09-14T19:52:21+5:302017-09-14T19:53:58+5:30
समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा २०१६ चा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातुन माध्यमीक विभागातुन प्रा.विलास शालीग्रामजी गांजरे यांना जाहीर झाला.

प्रा. गांजरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा २०१६ चा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातुन माध्यमीक विभागातुन प्रा.विलास शालीग्रामजी गांजरे यांना जाहीर झाला.
स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कनिष्ठ महाविालयातील शिक्षक विलास शालीग्राम गांजरे हे यावर्षीच्या पुरस्काराने मानकरी ठरले आहेत. गांजरे यांनी अनेक प्रकारचे शेक्षणिक सामाजिक पर्यावरणीय उपक्रम राबविले असुन अनेक उपक्रम हाताशी घेतले आहेत. मेळघाटामध्ये गेल्या तीन वर्षात आदिवसींना सात हजार कपड्यांचे वाटप वृध्दाश्रमातील वृध्दांना दरवर्षी उपहार भेट,स्वच्छता अभियानाचे कार्य, अंधश्रध्दा निर्मुलनासाठी अनेक व्याख्याने वृक्षारोपण,, अनेक आरोग्य शिबिराचे व पशु तपासणी शिबिरांचे आयोजन शेतकºयांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा , प्लॉस्टीक मुक्तीसाठी कार्य, अनेक गावामध्ये विद्यार्थी सहभागातुन शोषखड्डे व शौच खड्यांची निर्मिती,ग्रंथालय, अनेक उपक्रम त्यांनी राबविले असुन विविध विषयावर त्यांचे शोध निबंध प्रसिध्द झाले. सशक्त राष्ट्र आणि सशक्त समाज घडविण्यासाठी त्यांचे संस्कारक्षम कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व घडविणारे आहे. त्यांच्या या विविध कार्याच्या पैलुचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने त्यांना २०१६ -१७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.