शेतकरी, कर्मचाºयांच्या वादामुळे तूर खरेदी थांबली
By Admin | Updated: May 14, 2017 14:22 IST2017-05-14T14:22:23+5:302017-05-14T14:22:23+5:30
तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकºयांत शनिवारी वाद झाला.

शेतकरी, कर्मचाºयांच्या वादामुळे तूर खरेदी थांबली
मालेगावातील प्रकरण: शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार
वाशिम: बाजार समितीच्या ओट्यावर मोकळी पडलेली तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शनिवारी वाद झाला. त्यामुळे येथील खरेदी बंद पडली. आता शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत तूर मोजणीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. शासनाने ३१ मेपर्यंत नाफेडच्या तूर खरेदीला मुदतवाढ दिली. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर आधीपासूनच प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलास मिळाला. तसेच नव्याने तूर विक्रीसाठी आणण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. तथापि, हे सर्व कागदोपत्रीच असल्याचे दिसत होते. अखेर नाफेडच्या खरेदीला पुन्हा सुरुवात झाली. त्यातच शनिवारी मालेगावात तूर मोजणी सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अशातच एका शेतकऱ्याची तूर पाण्याने थोडी ओली झाली. तेवढ्यावरूनच सदर तूर मोजून घेण्यास नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आधीच वैतागलेल्या त्या शेतकऱ्यासह इतरही शेतकऱ्यांचा पारा चढला आणि नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे दुपारपासुनच येथील तूर मोजणी थांबली आणि रविवारीही या मोजणीला सुरुवात होऊ शकली नसल्याने शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोट: मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी नाफेडवर विक्रीसाठी आणलेली तीन पोते तूर पावसात ओली झाली. ती मोजण्यावरून नाफेडचे कर्मचारी व शेतकऱ्यांत वाद झाल्याने तूर मोजणी बंद करावी लागली. सोमवारपासून पोलीस बंदोबस्तात तूर मोजणी केली जाईल. -प्रकाश कढणे सचिव बाजार समिती मालेगाव