कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:06+5:302021-05-30T04:31:06+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस ५० लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हा परिषदेस ५० लाख रुपयांवरील खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात ...

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस ५० लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हा परिषदेस ५० लाख रुपयांवरील खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत; पण सद्य:स्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. तथापि, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित शासन निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधविषयक बाबींची खरेदी करताना संबंधित शासन निर्णय तसेच खरेदीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून यथोचित कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय २७ मे राेजी जारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जलद गतीने निर्णय होण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.