Pulwam Terror Attack: वाशिम जिल्हयात तीव्र संताप, निषेध अन श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:54 PM2019-02-16T13:54:52+5:302019-02-16T13:55:20+5:30

वाशिम : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारनंतर शनिवारीही जिल्हयाभरात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Pulwam Terror Attack: Fury, protest and tribute in the Washim district |  Pulwam Terror Attack: वाशिम जिल्हयात तीव्र संताप, निषेध अन श्रध्दांजली

 Pulwam Terror Attack: वाशिम जिल्हयात तीव्र संताप, निषेध अन श्रध्दांजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारनंतर शनिवारीही जिल्हयाभरात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. सर्व व्यापाºयांनी बंद पुकारला तर शाळा, महाविद्यालय व नागरिकांनी निषेध व्यक्त करीत श्रध्दांजली सभा घेतल्या. 
वाशिम येथील मुख्य रस्त्यावरील नगरपरिषद व्यापारी गाळे येथे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता निषेध सभा घेवून शहिद जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी नगरपरिषद कॉम्पलेक्समधील जवळपास सर्वच व्यापाºयांची येथे उपस्थिती होती. जिल्हयातील शहरांसह ग्रामीण भागातील प्रतिष्ठानांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याचे दिसून आले. 
जउळका रेल्वे : मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे येथे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कडकडीत बंद पाळून गावातील नागरिकांनी रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदविला. जऊळका रेल्वे येथील बसथांब्यांवर शहिदांना श्रध्दांजली सभा घेण्यात आली. यावेळी युवकांनी पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. यावेळी ग्रामस्थांमध्ये चांगलाच संताप दिसून येत होता.
शिरपुर जैन :  पुलवामा येथे भारतीय जवानांच्या वाहनावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना  शिरपुर जैन येथे  १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.   या हल्ल्याची सर्वत्र निंदा होत असून ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. त्यानुसार शिरपूर येथे सायंकाळी साडेसात वाजता  शहिदांना देण्यात आली. यावेळी कॅन्डल मार्च सुद्धा काढण्यात आला. भारतीय जवान अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुदार्बाद असे नारे देण्यात आले. यावेळी पाकिस्तानी अतिरेक्याचा प्रतिकात्मक पुतळा सुद्धा जाळण्यात आला. या श्रद्धांजली कार्यक्रमाला अशोकराव देशमुख, नंदकिशोर उल्हामाले, कलीम रेघीवाले, सुरेश देशमुख, रवी देशमुख, बाळू देशमुख, गणेश देशमुख, गोलू मानवतकर, सचिन मानवतकर, महेश देशमुख, धनंजय देशमुख, विनोद देशमुख, बबलू देशमुख, देविदास जाधव, नुकतेच सेवानिवृत्त झालेले सीआरपीएफचे नंदकिशोर देशमुख, बीएसएफ चे   मुकुंदराव देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रमेश गोडघासे, वैभव देशमुख, किशोर देशमुख, मनोज नाईक, बबन चव्हाण यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.


 
उर्दू शाळेत शहिदांना वाहिली श्रध्दांजली
मंगरुळपीर:  जम्मू-कश्मीर के पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात ४४ जवान शहीद झाले. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना पोघात येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.  तसेच या हल्ल््यात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती लवकर स्वस्थ व्हावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली. या संकट आणि दु:खाच्या काळात संपूर्ण देश शहीद जवानांच्या पाठीशी उभा असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापक  जियाउर्रहमान कुरेशी, शिक्षक वाजिद हुसेन, अफसर खान, ईरफान अन्सारी, हिफ्जुर्रहमान कुरैशी आणि शबनम दरख्शा यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Pulwam Terror Attack: Fury, protest and tribute in the Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.