मानोरा तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST2021-02-05T09:21:57+5:302021-02-05T09:21:57+5:30
मानोरा तालुक्यात १३९ बूथ आणि १० स्टँडवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ...

मानोरा तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम उत्साहात
मानोरा तालुक्यात १३९ बूथ आणि १० स्टँडवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ० ते ते ५ वर्षे वयोगटातील १५ हजार ८३१ बालके असून, यातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर जाधव यांच्या मार्गदर्शनात मानोरा शहरातील १७ वाॅर्डसह ७७ ग्रामपंचायतींमधील बालकांना पल्स पोलिओ लस मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, गिट्टीखदान आणि स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी फिरते पथकही लसीकरणासाठी तैनात करण्यात आले होते. एकूण ३४५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली.
तालुक्यांमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका खाते प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली होती. गटविकास अधिकाऱ्यांनानीही प्रत्येक गावामध्ये एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून केली होती.
काही अपरिहार्य कारणामुळे लसीकरण न होऊ शकलेल्या बालकांना घरोघरी जाऊन २ आणि ४ फेब्रुवारी तारखेला लसीकरण करण्यात येणार आहे.